सर्व वैद्यांसह सामान्य नागरिकांनी ‘जीवन संजीवनी तंत्र’ (CPR) शिकून घेणे काळाची आवश्यकता ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.