सनातनच्या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘समाज सात्त्विक होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सात्त्विकीकरण होणे आवश्यक आहे’, अशी शिकवण दिली आहे…

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीरपणे उत्तरे द्या !

मे २०२५ मध्ये गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्यानंतर काही जिल्ह्यातील पोलीस या महोत्सवाच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांची, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची चौकशी करत आहेत.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

२२.९.२०२५ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

गोव्यातील ऐतिहासिक सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश वडियार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

गोव्यात हिंदु संस्कृती आणि मंदिरे टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश राजेंद्र वडियार यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील चालणारे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले.

गंगामातेच्या रक्षणासाठी निःस्वार्थपणे काम करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मानित !

‘गंगारत्न’ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ मध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव सहभागी !

मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.

भाद्रपद पौर्णिमा (७.९.२०२५) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण !

खग्रास चंद्रग्रहण, म्हणजे जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात अन् पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्णपणे पडते. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकोळलेला दिसतो. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते.

पुणे येथील सनातनचे साधक श्री. रवींद्र गोंधळेकर (वय ८० वर्षे) आणि श्रीमती वर्षा भिडे (वय ७३ वर्षे) संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. रवींद्र गोंधळेकर (वय ८० वर्षे) तर साधिका श्रीमती वर्षा भिडे (वय ७३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा पुणे येथे पार पडलेल्या एका आनंददायी सोहळ्यात करण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ डॉ. नीलेश लोणकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी.

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ; दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’ अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या श्री. संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ केला.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सनातन संस्थेच्या वतीने राजस्थान येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोजत येथील नृसिंहपुरामधील राधा कृष्ण मंदिर, अजमेर येथे पुष्कर रोडवरील खाटू श्याम मंदिर आणि जयपूर येथे चौरा रस्ता भागातील राधा दामोदर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते.