
धारुहेरा (हरियाणा) – नवरात्रोत्सवानिमित्त येथील ‘सोसायटी बेस्टेक सिटी’च्या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शास्त्रानुसार नवरात्र कसे साजरे करावे ? अखंड दिवा का लावावा ? कुमारिका पूजन कसे करावे ? देवीला कुंकूमार्चन केल्याने तिचा आशीर्वाद आणि शक्ती कशी प्राप्त होते ? आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कुंकूमार्चन कसे करावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. एका जिज्ञासूने सांगितले, ‘मला या शास्त्राविषयी माहिती नव्हती. या प्रवचनात मौल्यवान माहिती मिळाली.’ त्यांनी सनातन संस्थेच्या सर्व प्रवचनांना उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला