
रामनाथी (गोवा) – केरळमधील प्रसिद्ध कोडुंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सौ. जयश्री अडिकल आणि काही सहकारी उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. कीर्ती नल्लूर यांनी आश्रमात चालू असलेल्या कार्याची त्यांना माहिती दिली. याप्रसंगी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सनातन-निर्मित्त ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.
आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय व्यक्त करतांना अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल म्हणाले, ‘‘आश्रमाला दिलेली भेट, हा एक अद्भुत अनुभव होता. सनातन धर्माच्या रक्षणासाठी चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. या कार्याला श्री लोकांबिकादेवीचा आशीर्वाद प्राप्त होवो, अशी प्रार्थना.’’ त्यांच्यासमवेत आलेल्या इतरांना आश्रमात आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !