भारतात पुन्हा एकदा ‘रामराज्या’ची गुढी उभारण्यासाठी कटीबद्ध होऊया !

रामराज्य, म्हणजे असे राज्य जिथे आध्यात्मिक श्रद्धा सुशासनामध्ये परावर्तित होते. आजच्या काळातही भारतात आदर्श राजा, सात्त्विक प्रजा, सुशासन आणि सुरक्षा असलेले रामराज्य आणणे, हीच खरी कालानुसार धर्मसंस्थापना आहे.

सनातन संस्था एक प्रखर राष्ट्रप्रेमी संघटना आहे ! – उदय माहुरकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त

महंमद अली जिना यांच्या ‘मुस्लिम लीग’प्रमाणे कार्यरत असलेल्या काँग्रेसने देहलीत नुकत्याच झालेल्या सनातन संस्थेच्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला मोदी सरकारने निधी दिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दोषारोप केले आहेत.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी ! भावी पिढीवर साधनेचा संस्कार करण्यासाठी साधक-पालकांनी सुटीत त्यांच्या पाल्यांना सनातनच्या आश्रमांत पाठवावे !

नांदेड येथील श्रीमती अनिता बरारा (वय ७२ वर्षे) सनातन संस्थेच्या १३८ व्या (समष्टी) संतपदी विराजमान !

सनातनच्या साधिका श्रीमती शालिनी गोजे यांनी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांना पुष्पहार घालून, तर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

‘फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६, मंगळवार) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रस्तोदित, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल.

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

आमची अपकीर्ती करणार्‍यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.

महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !

प्रदर्शनाला खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य मान्यवर यांच्या उत्स्फूर्त भेटी !

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) आणि गाझियाबाद (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे आयोजित केलेल्या ‘विशाल हिंदु परिषदे’त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

विशाल हिंदु परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य आणि रा.स्व. संघाचे कार्यकर्ते श्री. आशिष भारती यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे कौतुक केले.