२६० हून अधिक मुलांनी घेतला लाभ

पुणे – सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याकारणाने पालकांना आपल्या पाल्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा होईल ? असा प्रश्न पडतो. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत आहे.

यामध्ये आतापर्यंत भोर, सिंहगड रस्ता, भोसरी, जुन्नर, हडपसर, कोथरूड, चिंचवड, विश्रांतवाडी आदी ठिकाणी आयोजन करण्यात आले. त्याचा लाभ ९ ते १५ वर्षे वयोगटातील २६० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.

यामध्ये मुलांना योग-प्राणायाम याचे प्रात्यक्षिक, चित्रकला स्पर्धा, नामस्मरणाचे महत्त्व, धर्माचरणाचे महत्त्व आदि विषयांचा सहभाग होता.
विशेष
१. यामुळे बालसंस्कार, तसेच धर्मशिक्षणवर्ग यांची मागणी समाजातून येत आहे.
२. उपक्रमाला पालक आणि मुले यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
क्षणचित्रे –
१. तानाजी नगर, चिंचवड येथील मंदिरात येणार्या भाविकांनी संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना खाऊ देण्यासाठी रक्कम तसेच बिस्कीट पुडे उपलब्ध करून दिले, असे मंदिर विश्वस्त श्री. सोले यांनी सांगितले. समाजातील हिंदूंसाठी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी मागणी या वेळी करण्यात आली.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !
फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !
सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !
इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद