मुंबईत होणार्‍या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !

यज्ञाच्या प्रसारासाठी आतापर्यंत घेण्यात आल्या २४३ कुटुंब बैठका, तर २५ हून अधिक सामूहिक बैठका !

यज्ञ सोहळ्याची माहिती ऐकतांना नागोठणे (जिल्हा रायगड) येथील मंदिरातील भाविक

मुंबई, १३ मे (वार्ता.) – आदिशक्तिदेवी सतीच्या १० रूपांपैकी, म्हणजेच दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवी होय. श्री राजमातंगीदेवी आदिशक्तीची प्रधानमंत्री (सल्लागार) आहे आणि शक्ति अन् वाणी यांची देवता आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी आणि धर्मकार्यासाठी देवीचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे देवीचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा, यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या ठिकाणच्या शहरी भागांमधील सोसायटी, तर ग्रामीण भागांमध्ये गावागावांत, तसेच वाड्यांमध्ये बैठका घेऊन महायज्ञाचा प्रसार करण्यात येत आहे. यज्ञाच्या प्रसारासाठी आतापर्यंत २४३ कुटुंब बैठका, तर २५ हून अधिक सामूहिक बैठका घेण्यात आल्या. याद्वारे सहस्रो जिज्ञासूंपर्यंत महायज्ञाचे महत्त्व पोचवण्यात आले आहे.

खोपोली (जिल्हा रायगड) येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात यज्ञाविषयी दिली जाणारी माहिती ऐकतांना युवक-युवती

रायगड, ठाणे आणि  पालघर या जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहेत. मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीच्या युवा प्रशिक्षण वर्गांमध्ये येणारे युवक आदींच्या, तसेच गृहसंकुलांमधील नागरिकांच्याही बैठका घेण्यात येत आहेत.

कामोठे (जिल्हा रायगड) येथे एका घरी माहिती देतांना साधिका

१०० हून अधिक पूर्णवेळ, तर शेकडो साधक-धर्मप्रेमी यांच्याकडून महायज्ञाचा प्रसार !

सद्यःस्थितीत १०० हून अधिक सनातनचे साधक आणि धर्मप्रेमी महायज्ञाच्या प्रसारकार्यात सक्रीय आहेत. यासह नोकरी-व्यवसाय करणारे साधक आणि धर्मप्रेमी, तसेच काही गृहिणी. असे शेकडो जण मागील काही दिवसांपासून महायज्ञाचा प्रसार करत आहेत.

महनीय व्यक्तींनी केली नोंदणी !

पाली (जिल्हा रायगड) येथे मंदिर विश्वस्तांना निमंत्रणपत्रिका सनातनचे साधक श्री. राजेंद्र पावसकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट

डॉक्टर, अधिवक्ते, प्राध्यापक, उद्योजक, मंदिरांचे विश्वस्त, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार अदी महनीय व्यक्तींनी श्री राजमातंगी महायज्ञाला येण्यासाठी नोंदणी केली आहे. यज्ञाचा आध्यात्मिक लाभ व्हावा, यासाठी अनेक जण कुटुंबासह उपस्थित रहाणार आहेत.

Leave a Comment