धुळे येथे नवरात्रोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना मंदिराचे मुख्य विश्वस्त १. श्री. सोमनाथ गुरव आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक २. सद्गुरु नंदकुमार जाधव

धुळे – येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन अन् नारळ वाढवून करण्यात आले. नवरात्रीच्या ९ दिवसांच्या काळात पहाटे ६ ते रात्री ११.३० पर्यंत हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. अनेक जिज्ञासू या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ करून घेत आहेत.

Leave a Comment