काळानुसार साधना केल्यास वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात आनंदी रहाणे सहज शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो. आज बहुतांश जणांकडे पैसा असूनही मन:शांती नाही, अशी स्थिती आहे.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथील ग्रंथप्रदर्शन कक्षांचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथे सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला. याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोच्ची (केरळ) येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. संस्थेच्या साधिका सौ. शोभी सुरेश यांनी उपस्थित भक्तांना ‘पितृपक्ष आणि या काळात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व’ यांविषयी माहिती सांगितली.

साधना हीच आनंदाची गुरुकिल्ली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा.

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्यांवरील उपायांविषयी हिंदूंना कुठेही दिशा दिली जात नाही. याचा परिणाम हिंदूंच्या व्यावहारिक, कौटुंबिक आणि धार्मिक गोष्टींवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्ष्मणपुरी (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील विविध शासकीय विभागांतून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही उत्तरप्रदेश या राज्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत जिज्ञासूंना भेट देणे चालू केले. उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे आम्हाला आलेले अनुभव कृतज्ञतापूर्वक पुढे दिले आहेत.

पिंगळी खुर्द (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

सातारा तालुक्यातील पिंगळी खुर्द या गावात सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. शोभा अशोक थोरात यांचे नातेवाईक श्री. पोपट सदाशिव थोरात यांच्या घरी वर्षश्राद्ध होते. त्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.

गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.