फरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

मार्गदर्शन करताना कु कृतिका खत्री

फरीदाबाद (हरियाणा) – येथील सेक्टर १२ मधील कन्व्हेंशन सेंटरमध्ये २ ते ४ डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. या महोत्सवामध्ये ३ डिसेंबर या दिवशी झालेल्या संमेलनामध्ये सनातन संस्थेच्या सुश्री (कु.) कृतिका खत्री यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून आनंद कसा मिळवायचा, याविषयी मार्गदर्शन केले.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. कृष्णपाल गुर्जर यांना ग्रंथ भेट देतांना सनातनच्या साधिका सौ. तृप्ती जोशी

क्षणचित्रे

१. या महोत्सवासाठी आलेले केंद्रीय अवजड उद्योग आणि ऊर्जा राज्यमंत्री श्री. कृष्णपाल गुर्जर, फरीदाबादचे आमदार श्री. नरेंद्र गुप्ता, फरीदाबादचे उपायुक्त श्री. विक्रम सिंह यांनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

२. या वेळी सरकारच्या वतीने सनातन संस्थेला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Leave a Comment