पुणे – ‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ या आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील शिंदे यांनी दिला. खेड शिवापूर येथील ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ या आस्थापनात १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकास आणि साधना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचा लाभ अनेकांनी घेतला. व्याख्यान झाल्यानंतर आस्थापनाच्या कामगारांनी प्रा. जाधव यांना भेटून विषय आवडल्याचे सांगितले आणि ‘पंचक्रोशीतील गावांमध्येही आम्ही असे कार्यक्रम ठेवू’, असे सांगितले.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !