मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

सनातनचे पंचांग पहातांना आशिष शेलार, समवेत प्रकाश गंगाधरे आणि सौ. आशा गंगाधरे

मुंबई – मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर, माजी खासदार श्री. किरीट सोमय्या, भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री. आशिष शेलार आदी मान्यवरांसह अनेक जिज्ञासूंनी भेट दिली.

सनातन संस्थेच्या वतीने सौ. आशा गंगाधरे यांनी सर्वश्री आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांना वर्ष २०२३ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले. कोकणातील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि कोकणातील रोजगार यांना चालना मिळावी, यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांना आवर्जून सनातनचे ग्रंथप्रदर्शन दाखवले. २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव पार पडला. मुंबईसह कोकणातील विविध जिल्ह्यांतील नागरिक आणि जिज्ञासू यांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन अध्यात्म, राष्ट्र-धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांची खरेदी केली.

Leave a Comment