सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

१३ सप्टेंबर २०१५ या दिवशी सनातनच्या साधिका श्रीमती मंगला खेरआजी यांनी संतपद गाठल्याची आनंदवार्ता पू. (कु.) स्वाती खाडये यांनी सर्व साधकांना सांगितली. या वेळी आजींच्या नातेवार्इकांनी त्यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. सौरभ जोशी यांच्याभोवती चांगले वलय दिसत असून त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्‍चितच लाभ होईल, असे संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी सांगणे

संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि त्यांचे सहकारी १९.११.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत हे त्यांना घेऊन पू. सौरभदादा यांना भेटण्यासाठी गेले.

सनातन संस्थेचा नव्हे, तर हिंदु धर्माचाच द्वेष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २००० या वर्षीच्या वार्षिक विशेषांकात मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सनातन संस्थेविषयीचे आक्षेप आजही तेच आहेत; म्हणून आमच्या वाचकांसाठी त्यातील उतारे वैचारिक प्रतिवादासह प्रसिद्ध करत आहोत.

वैज्ञानिक प्रयोगाद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीमध्ये चैतन्य आणि ऊर्जास्रोत असल्याचे पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी सिद्ध करून दाखवणे

वर्ष १९७२ मध्ये अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीविषयी वाटले, जर संत ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.

सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी

राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. पू. (श्रीमती) शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत काही विधाने केली. या विधानांच्या संदर्भात एबीपी माझा, साम इत्यादी वृत्तवाहिन्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.

कर्नाटक येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेण्याची प्रथा धर्मसंमत आहे का ?

मंगळुरू येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात प्रतिवर्षी कार्तिक कृ. षष्ठीला उत्सव असतो. या दिवशी देवतापूजनानंतर प्रथम ब्राह्मणभोजन केले जाते. या वेळी ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा आहे.

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?

शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्‍यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात…

शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.