पू. सौरभ जोशी यांच्याभोवती चांगले वलय दिसत असून त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्‍चितच लाभ होईल, असे संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी सांगणे

पू. (कु.) सौरभ जोशी

संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि त्यांचे सहकारी १९.११.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत हे त्यांना घेऊन पू. सौरभदादा यांना भेटण्यासाठी आले. ते येताच पू. सौरभदादा यांनी या असे म्हटले. पू. सौरभदादा यांना पहाताच श्री. नाईक यांनी हात जोडले. त्यानंतर आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत त्यांना पू. सौरभदादा यांच्याविषयी सांगतांना म्हणाले, बाह्यतः हे बहुविकलांग दिसत आहेत; परंतु आध्यात्मिक दृष्टीने उन्नत आहेत. ते संत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही माहिती नसतांना तुमचे हात जोडले गेले. यावर श्री. नाईक म्हणाले, त्यांच्याभोवती वलय (ऑरा) दिसत आहे. चांगले आहे. त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्‍चितच लाभ होईल. – श्री. संजय जोशी (पू. सौरभदादा यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१५)