परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत ! – प.पू. देवबाबा

परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले.

कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी ! सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना … Read more

साधी राहणी असणारे, जगाला नामस्मरणाची शिकवण देणारे आणि अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन झालेले नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज !

परम श्रद्धेय पूजनीय श्री काणे महाराज (गोळ्या वाटणारे बाबा) यांनी २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजता देहत्याग केला. त्यानिमित्त प.पू. महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन, भजन आणि भंडारा ४.११.२०१७ या दिवशी वारुळवाडी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.

प.पू. भगवानदास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीबाई आणि पुत्र प.पू. दास महाराज यांचा साधनाप्रवास !

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक संतांची तपोभूमी ! कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज, पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, माणगावचे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी, हे सर्व सिंधुदुर्गातील संत आहेत.

पिंपरी येथील वाचक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ ह्या विषयावर मार्गदर्शन

२९ ऑक्टोबर या दिवशी येथील दक्षिणमुखी मारुति मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेला ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थित वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.

ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत ! – प.पू. देवबाबा

भगवान श्रीकृष्णाने गोमातेचे पूजन केले. यावरून गोमातेचे स्थान कुठे आहे, हे विचार करण्यासारखे आहे. ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

अध्यात्म या विषयावर साधना नसणार्‍या एका लेखकाने, एका भोंदू गुुरूने लिहिलेली पुस्तके आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवरील परिणाम अभ्यासणे

भोंदू गुरु अध्यात्मावर पुस्तके लिहितात आणि विदेशातही अध्यात्मावर लिखाण होत असून ही पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे अध्यात्मावर पुस्तक लिहिणारा कसा आहे आणि त्याच्या पुस्तकाचा वाचकावर कसा परिणाम होऊ शकतो ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो ! – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.

सनातन आश्रमात चांगले वाटून सकारात्मक स्पंदने आणि मनाची शांतता जाणवली ! – श्रीमती सविता रंगनाथ, हिंदु जागरण वेदिके, बेंगळुरू

सनातन संस्थेचे कार्य, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वच्छता आणि आदरभाव बघून हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया