सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो ! – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला

दैनिक सनातन प्रभातचा विशेषांक पहातांना प.पू. स्वामिनी मंगलानंदा आणि समवेत अधिवक्त्या सौ. श्रुती भट

अकोला – सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले. येथील अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांच्या निवासस्थानी ब्रह्मलीन प.पू. स्वामी चिन्मयानंदजींच्या शिष्या आणि आचार्या चिन्मय मिशन, अकोला येथील प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांच्या श्रीमद्भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधकांनी प.पू. स्वामिनींची भेट घेऊन त्यांना सनातनच्या कार्याविषयी अवगत केले. तेव्हा त्या बोलत होत्या. सनातनच्या अधिवक्त्या सौ. श्रुती भट यांनी त्यांना सनातन पंचांग २०१८ आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव विशेषांक भेट म्हणून दिला. त्यांनी जिज्ञासेने त्याचे अवलोकन केले.

या प्रसंगी प.पू. स्वामिनी म्हणाल्या, हीनानि गुणानि दूषयति इति हिंदुः । ही हिंदूंची व्याख्या सर्वांना ठाऊक असायला हवी. केवळ जन्महिंदू नको. मुसलमान आणि ख्रिस्ती आपापल्या धर्मांसाठी पुष्कळ कार्य करतात. जम्मूत रोहिंग्या मुसलमानांनी आश्रय घेतला आहे; पण आपल्या काश्मिरी पंडितांची स्थिती काय आहे ?

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment