ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत ! – प.पू. देवबाबा

Article also available in :

डावीकडून नृत्यनाट्याचे दिग्दर्शक के.व्ही. रमण, प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ. उत्तम माहेश्‍वरी, योगाचार्य प.पू. देवबाबा आणि डॉ. उदय धुरी

नेरूळ (नवी मुंबई) – भगवान श्रीकृष्णाने गोमातेचे पूजन केले. यावरून गोमातेचे स्थान कुठे आहे, हे विचार करण्यासारखे आहे. ब्रह्मांडातील स्पंदने गायीमध्ये आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीरामचंद्र हे मानव रूपातून भूमीवर आले. त्यांनी गोमातेचे पूजन केले म्हणजे गोमाता देवतासमानच आहे. या भूमीवर येऊन ती केवळ सेवा करत आहे. तिची सेवाही सनातन धर्मच आहे. विज्ञान माणसाचे मन नियंत्रणात ठेवू शकत नाही; परंतु गाय ते ठेवू शकते.

आण्विक युद्धात देशी गायीचे पंचगव्यच उपयोगी ! – डॉ. उदय धुरी

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी म्हणाले, ‘‘वर्ष २०१८ नंतर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात उत्पात होणार आहे. रूस वैज्ञानिकाने म्हटले आहे की, जेव्हा आण्विक युद्ध होईल, तेव्हा देशी गायीचे पंचगव्यच उपयोगी पडणार आहे. ऋषीमुनींनीही याचा ग्रंथात उल्लेेख केला आहे. गोमूत्र हे विषनाशक असून रसायन आहे. ते सप्तधातूंची पुष्टी करत असून त्रिदोषनाशक आहे. सध्या गोरक्षणासाठी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात गोहत्या बंद होणार असून कोणी गायीकडे हत्या करण्याच्या दृष्टीने पहाणारही नाही. गोमांस असलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये होणारा चामड्याचा वापर यांमुळे संबंधित वस्तूंवर बहिष्कार टाकावा.’’

या प्रसंगी आरोग्य तज्ञ उत्तम महेश्‍वरी यांनी देशी गायीचे तूप, गोबर, गोमूत्र यांचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गुप्ता यांनी केले. या वेळी ‘विश्‍वमाता गोमाता’ या नृत्यनाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment