सनातन आश्रमात चांगले वाटून सकारात्मक स्पंदने आणि मनाची शांतता जाणवली ! – श्रीमती सविता रंगनाथ, हिंदु जागरण वेदिके, बेंगळुरू

प.पू. डॉ. आठवले यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम

 

१. सनातनच्या आश्रमात आध्यात्मिकदृष्ट्या
पुष्कळ चांगले वाटून सकारात्मक स्पंदने आणि मनाची शांतता जाणवली !

‘सनातनचा हा आश्रम विलक्षण आणि आश्‍चर्यकारक आहे. मला इथे आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ चांगले वाटले आणि सकारात्मक स्पंदने अन् मनाची शांतता जाणवली. माझ्याभोवती असलेले त्रासदायक आवरण निघून गेले.’

– श्रीमती सविता रंगनाथ ‘हिंदु जागरण वेदिके’ (हिंदु जागरण मंच), बेंगळुरू, कर्नाटक. (२०.६.२०१६)

 

२. ‘हिंदु राष्ट्र येण्यासाठी अध्यात्म आणि हिंदु धर्म
यांचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा आश्रम उत्कृष्ट आहे.’

– डॉ. रामकृष्ण गौड मुश्काम, प्रमुख सचिव, एस्.एस्.एम्. सुभद्रा निलायम स्कूल, श्री सरस्वती शिशुमंदिर, आदिलाबाद, तेलंगण.(२१.६.२०१६)

 

३. आश्रमापासून मला पुष्कळ प्रेरणा मिळाली !

अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. धर्म आणि राष्ट्र यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणे, हे खरोखरच एक उदात्त कार्य आहे.

आ. भारतीय तत्त्वज्ञान, हिंदु संस्कृती आणि सणांचे महत्त्व यांचा प्रसार करण्याचे साधक करत असलेले कार्य खरोखरच स्तुत्य आहे.

इ. या वास्तूला अध्यात्माचा स्पर्श आहे.

ई. आश्रमापासून मला पुष्कळ प्रेरणा मिळाली असून माझ्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे अध्यात्माचे कार्य करण्यासाठी समर्पित करण्याचे मी निश्‍चित केले आहे.’

– श्री. श्रीनिवास रेड्डी सत्यपु, कार्यकर्ता, ‘स्वाध्याय परिवार’, तेलंगण. (२१.६.२०१६)

 

४. ‘हा आश्रम स्वर्गाप्रमाणेच आहे.’

– श्री. टी.एन्. मुरारी, राज्य प्रमुख, शिवसेना, आंध्रप्रदेश आणि तेलंगण (२१.६.२०१६)

 

५. आश्रम पाहून पृथ्वीवरील प्रभु
श्रीरामचंद्रांच्या काळातील वैदिक संस्कृतीची आठवण झाली !

‘आश्रमात शुद्धता आणि पावित्र्य जाणवले. आश्रम पहायला मिळाल्याबद्दल मला धन्य वाटले आणि मला पृथ्वीवरील प्रभु श्रीरामचंद्राच्या काळातील वैदिक संस्कृतीची आठवण झाली.’

– श्री. कुरूताई, अरुणाचल प्रदेश (२०.६.२०१६)

 

६. आश्रमातील वातावरणात निश्‍चितपणे दैवी शक्ती आहे !

‘मी आश्रमात प्रथमच येत आहे. मला इथे येऊन पुष्कळ आनंद झाला. आश्रमातील स्पंदने मनाला आल्हाददायक वाटतात. येथील संपूर्ण वातावरणात निश्‍चितपणे दैवी शक्ती आहे.’

– श्रीमती सुधा एन्. प्रभू (एका धर्माभिमान्यांची बहीण), शिमोगा (२०.६.२०१६)

 

७. ‘स्वतःविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आश्रमाला भेट देणे आवश्यक आहे.’

– श्री रमेश गुप्ता, भाग्यनगर, तेलंगण (२१.६.२०१६)

 

८. आपली हिंदु संस्कृती जपण्यासाठी एक संस्था कार्यरत
आहे, हे मला ठाऊक नव्हते, ते समजले आणि तिचे कार्यही समजले !

अ. एखादी संस्था आपली (हिंदु) संस्कृती आणि सण यांसाठी कार्य करत असेल, अशी मी कधी कल्पनाच केली नव्हती. आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. आश्रम अतिशय स्वच्छ असून येथील आदरभाव चांगला आहे. एकंदरीत माझ्यासाठी हा एक चांगला अनुभव आहे.

– श्री. के. दत्थू राव, तेलंगण (२४.६.२०१६)

आ. हिंदूंचे सण कसे साजरे करावे ? थोरांचा आदर कसा राखावा ? आपली हिंदु संस्कृती किती महान आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संस्था कार्य करत आहे, हे मला ठाऊक नव्हते. आश्रमातील स्वच्छता आणि आदरभाव फार चांगला आहे. येथील गणपतीची मूर्ती आश्‍चर्यकारक आहे.

– श्री. संतोष अष्टीकर, तेलंगण (२४.६.२०१६)

 

९. आरती कशी करावी ?, याचे शास्त्र समजले !

आरती कशी करावी ?, हे समजून घेण्याची माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली. घरी आम्ही आरती करतो; परंतु आरतीची वेळ आणि पद्धत यांविषयी माझ्या मनात शंका होती. ईश्‍वराने माझे शंकानिरसन केले. त्याविषयी मी कृतज्ञ आहे. जय गुरुदेव !

– श्री. विवेक आंचन, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (२०.६.२०१६)

Leave a Comment