नवरात्रीच्या काळात सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येत आहेत ‘दशमहाविद्या याग’ !

‘दशमहाविद्या’ यागाच्या ठिकाणी करण्यात आलेली पूजा

रामनाथी (फोंडा, गोवा) – येथील सनातन संस्थेच्या आश्रमात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या दिवसांमध्ये ‘दशमहाविद्या यज्ञ’ करण्यात येत आहेत. १५ ऑक्टोबर या दिवशी ‘कालीयाग’ आणि १६ ऑक्टोबरला ‘तारायाग’ पार पडला. ‘लवकरात लवकर सनातन धर्माची संस्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे आणि साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे’, या उद्देशाने हे यज्ञ होत आहेत. या यज्ञात करुंगाळी चूर्ण आणि मूलिका चूर्ण यांचे हवन करण्यात येणार आहे. या यागाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

‘दशमहाविद्या’ यागाविषयी महर्षींनी सांगितलेला उद्देश !

सनातन धर्माच्या संस्थापनेच्या कार्यात सर्व देवी-देवता आपल्याला साहाय्य करत असतात. त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आदिशक्तीची १० रूपे असलेल्या ‘दशमहाविद्या’ धर्मसंस्थापनेच्या कार्यात साहाय्य करणार आहेत. त्या दशमहाविद्यांच्या प्रीत्यर्थ यंदाच्या नवरात्रीमध्ये ‘दशमहाविद्या याग’ करण्यास महर्षींनी सांगितले आहे. काली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलांबिका या दशमहाविद्या आहेत.

Leave a Comment