परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !
संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.
