प.पू. डॉक्टरांना झालेले त्रास आणि सनातन आश्रमाच्या परिसरातील वनस्पती, प्राणी अन् पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

ज्याप्रमाणे घरात घडणार्‍या सुख-दुःखाच्या घटनांचा परिणाम घरातील प्रत्येकावर अल्प-अधिक प्रमाणात होतो, त्याप्रमाणेच आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात घडलेल्या अशाच काही घटनांच्या संदर्भात आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

१. प.पू. डॉक्टरांना २९.७.२०१६ ते १.८.२०१६ या कालावधीत झालेले विविध त्रास

२९.७.२०१६ या दिवशी सायंकाळी प.पू. डॉक्टर आजारी पडले. सायंकाळी खोलीत जात असतांना त्यांना चक्कर येऊन त्यांचा तोल जात होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी तपासल्यावर त्यांना १००.५ फॅरनहाईट ताप होता, असे लक्षात आले. त्यानंतर पुढे २ दिवस त्यांना ताप होता. त्यांची प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली होती. खोकला होता. अंगाला सूज आली होती आणि त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते. ३० आणि ३१.७.२०१६ या दिवशी त्यांना उलट्या होत होत्या. थोडेसे खाल्लेलेही उलटून पडत होते. या कालावधीत त्यांच्यात उठून बसायचेही त्राण नव्हते. उलट्या सोडल्यास बाकी सर्व त्रास त्यांना १ ऑगस्टपर्यंत होत होते. १.८.२०१६ या दिवशी ताप नव्हता.

२. याच कालावधीत आश्रम परिसरातील झाडांवर झालेले परिणाम

२ अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली तुळस सुकणे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकणे (२९.७.२०१६)
प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि
ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकणे (२९.७.२०१६)

२९.७.२०१६ या दिवशी दुपारी प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेली आणि ते प्रतिदिन पाणी घालत असलेली तुळस सुकल्याचे लक्षात आले.

२ आ. अश्‍वत्थाच्या लहान रोपाची पाने गळून पडणे

ashwatth
प.पू. डॉक्टर प्रतिदिन पाणी घालत असलेल्या कुंडीतील अश्‍वत्थाच्या लहान रोपाची ४ पाने एकेक करून गळून पडणे (२९.७.२०१६)

दुपारी प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या सज्जामध्ये ठेवलेले आणि महर्षींच्या आज्ञेवरून ते प्रतिदिन पाणी घालत असलेल्या कुंडीतील अश्‍वत्थाच्या (पिंपळाचा एक प्रकार) लहान रोपाची ४ पाने एकेक करून गळून पडली.

२ इ. आश्रम परिसरात असलेल्या पारिजातकाच्या झाडाच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडावर एकही पान शिल्लक न रहाणे (२०.९.२०१६)
रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडावर
एकही पान शिल्लक न रहाणे (२०.९.२०१६)
रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची हिरवीगार पाने पुष्कळ प्रमाणात गळण्यास प्रारंभ होणे (२९.७.२०१६)
रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची हिरवीगार
पाने पुष्कळ प्रमाणात गळण्यास प्रारंभ होणे (२९.७.२०१६)

 

मंगळुरू सेवाकेंद्राच्या आगाशीवर सकाळी कबुतर मेलेले आढळणे (२४.७.२०१६)
मंगळुरू सेवाकेंद्राच्या आगाशीवर सकाळी कबुतर मेलेले आढळणे (२४.७.२०१६)
मंगळुरू सेवाकेंद्रात सकाळी अर्धे शिर धडावेगळे झालेलेकबूतर आपोआप मरून पडलेले दिसणे (८.८.२०१६)
मंगळुरू सेवाकेंद्रात सकाळी अर्धे शिर धडावेगळे झालेलेकबूतर आपोआप मरून पडलेले दिसणे (८.८.२०१६)

मंगळुरू सेवाकेंद्राच्या आगाशीवर दुपारी पक्ष्याचे शिर आढळणे (२४.७.२०१६)

मंगळुरू सेवाकेंद्राच्या आगाशीवर दुपारी पक्ष्याचे शिर आढळणे (२४.७.२०१६)

मंगळुरू येथील पू. राधा प्रभू यांच्या घराच्या बाजूला मरून पडलेला कोकीळा पक्षी (६.८.२०१६)
मंगळुरू येथील पू. राधा प्रभू यांच्या घराच्या बाजूला
मरून पडलेला कोकीळा पक्षी (६.८.२०१६)

pakshi
२ इ १. २९.७.२०१६ ते २.८.२०१६ – झाडाची हिरवीगार पाने गळणे आणि कोमेजल्यासारखी होणे

२९.७.२०१६ या दिवसापासून आश्रमाच्या परिसरात असलेल्या पारिजातकाच्या झाडाची हिरवीगार पाने पुष्कळ प्रमाणात गळून जात आहेत, असे लक्षात आले. त्या झाडावर असलेली सर्व पाने कोमेजल्याप्रमाणे झालेली, म्हणजे प्राण नसल्यासारखी लोंबत असलेली दिसली आणि २.८.२०१६ या दिवसापर्यंत ती तशीच दिसत होती. या दिवशी आधीच्या पेक्षा प.पू. डॉक्टरांची प्रकृती थोडी बरी झाली.

२ इ २. ६.८.२०१६ : झाडाची ३० ते ४० टक्के पाने जळल्यासारखी काळी पडली होती.

२ इ ३. १०.९.२०१६ : झाडाची ६० टक्के पाने गळून पडली आहेत, असे लक्षात आले.

२ इ ४. २०.९.२०१६ : या झाडावर एकही पान शिल्लक राहिले नाही.

यावरून प.पू. डॉक्टरांवर आलेल्या संकटाचा परिणाम या झाडांवर कसा झाला, हे लक्षात येते. ही झाडे प.पू. डॉक्टरांशी जोडली गेली आहेत, हेही लक्षात येते. आपल्याला होणार असलेल्या त्रासाचा परिणाम आपल्या सान्निध्यातील वनस्पतींवर आधी होतो, हे सर्वश्रुत आहे. त्याप्रमाणेच या झाडांच्या संदर्भात घडले.

२ ई. आश्रम परिसरात आढळलेले प्राणी आणि पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

२ ई १. २४.७.२०१६

सकाळी मंगळुरू सेवाकेंद्राच्या आगाशीवर मेलेले कबुतर, तर दुपारी एका पक्ष्याचे शिर आढळले.

२ ई २. ६.८.२०१६

मंगळुरू येथील सनातनच्या संत पू. राधा प्रभू यांच्या घराच्या उजव्या बाजूला कोकीळा पक्षी मरून पडलेला दिसला.

२ ई ३. ८.८.२०१६

मंगळुरू सेवाकेंद्राच्या तिसर्‍या मजल्यावर सकाळी ८:३० च्या सुमारास कबूतर आपोआप मरून पडलेले दिसले. कोणीतरी त्याचा गळा चिरल्याप्रमाणे त्याचे डोके धडापासून अर्धे वेगळे झाल्याप्रमाणे दिसत होते.

२ ई ४. हिरव्या रंगाचा पक्षी मृत झालेला दिसणे

६.९.२०१६ या दिवशी सकाळी आश्रमासमोर एक हिरव्या रंगाचा पक्षी मरण पावलेल्या स्थितीत दिसला.

२ ई ५. पू. डॉ. मुकुल गाडगीळ रहात असलेल्या खोलीच्या समोरच्या आगाशीमध्ये मान नसलेला मृत पक्षी दिसणे – २३.९.२०१६ या दिवशी पू. डॉ. मुकुल गाडगीळ रहात असलेल्या खोलीच्या समोरील आगाशीमध्ये एक पक्षी आपोआप मरून पडलेला दिसला. या पक्ष्याला मान नव्हती. कुणीतरी मान खेचून काढल्याप्रमाणे मानेकडील आतील भाग पोकळ दिसत होता. बहुधा हा पक्षी मारून कोणीतरी आगाशीमध्ये करणीसारखे काहीतरी करण्यासाठी फेकला असावा.
– कु. प्रियांका लोटलीकर, अध्यात्म विश्‍वविद्यालय.(२३.९.२०१६)

वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !

आश्रम परिसरात विविध प्राणी-पक्षी, वनस्पती आपोआप मरण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर करावा ? हे समजण्यासाठी वैज्ञानिकांनी साहाय्य करावे, ही विनंती ! – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात