आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे द्रष्टेपण !

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! तिसरे महायुद्ध, भयंकर नैसर्गिक आपत्ती आदींच्या रूपातील आगामी आपत्काळ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००४ मध्येच ओळखला आणि अखिल मानवजातीचे जीवित आणि आरोग्य यांच्या रक्षणासाठी त्यांनी भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध करण्यास आरंभ केला. पुढील ग्रंथ हे याच मालिकेतील ग्रंथ आहेत.

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन
करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

व्यक्तीला होणा-या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणा-या विकारांवरील उपाय, रिकाम्या खोक्यांचे उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या शेकडो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. या पद्धतींचे सविस्तर विवेचन करणारे पुढील ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात