हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठीचे दिशादर्शक केंद्र !

आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते.

संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांना ध्यान लागण्याची प्रक्रिया

संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.

फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र

गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या ग-याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या बंद डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण आणि काही संतांकडील आपोआप निर्माण झालेल्या विभूती यांतील घटकांचा केलेला अभ्यास

ज्या हवाबंद डब्यात (‘हॉट-पॉट’मध्ये) रवाळ कण निर्माण झाले, त्या डब्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेवण वाढण्यात येत होते. जेवण वाढणार्‍या साधिकेने त्या डब्याचा उपयोग वर्ष २००९ पर्यंत ३ – ४ वर्षे केला होता आणि नंतर काही कारणाने तो डबा उपयोगात आणायचे थांबवले होते.

कु. अपाला आैंधकर आणि कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकांनी नृत्याच्या वेळी केलेल्या रंगभूषेचा (मेकअपचा) त्यांच्यावर झालेला परिणाम

पूर्वीच्या काळी रंगभूषेत सात्त्विक अलंकार, सात्त्विक पोषाख, सात्त्विक केशरचना, सुगंधी पुष्पे अशा घटकांचा उपयोग केला जात असे. ‘आताची रंगभूषा केल्यामुळे नृत्य करणार्‍यावर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थळे आदी सात्त्विक ठिकाणांची विभूती कपाळाला लावल्याने अथवा जवळ बाळगल्याने अनेकांना आध्यात्मिक अनुभूती येतात; कारण तेथील विभूती त्या पवित्र वातावरणामुळे चैतन्यमय झालेली असते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ईश्‍वरी चैतन्यामुळे इंडोनेशियामध्ये लोक त्यांच्याकडे स्वत:हून आकर्षिले जाणे !

‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.

चित्रकार-साधिकेने ‘कलेसाठी कला’ नव्हे, ‘साधना’ म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘चित्रकार-साधिका काढत असलेल्या सूक्ष्म चित्रातील स्पंदनांमध्ये तिच्या साधनेमुळे काय पालट झाले ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला.

कर्नाटकातील संडूर येथील डॉ. व्ही.टी. काळे यांनी भावपूर्ण रेखाटलेल्या तैलचित्रांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

चित्रकारात असणा-या भावामुळे ज्या वेळी तो भावपूर्ण कलाकृती रेखाटतो, त्या वेळी चित्रातील त्या त्या अवयवाचा संबंधित पंचतत्त्वाशी संयोग झाल्यामुळे ते ते अवयव हलतांना आणि दिशा पालटतांना दिसतात.

ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

‘ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो. ग्रहणकाळात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.