साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेच्या चित्राची वैशिष्ट्ये

वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र रेखाटले होते.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

कतरास (झारखंड) येथील प्रदीप खेमका, मुंबई (महाराष्ट्र) येथील सौ. संगीता जाधव आणि कर्नाटकमधील रमानंद गौडा संतपदी विराजमान

झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), मुंबई-ठाणे-रायगड आणि गुजरात राज्याच्या प्रसारसेविका सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि कर्नाटक राज्याचे धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले.

राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राजकीय नेतृत्व नव्हे, तर आध्यात्मिक नेतृत्व आवश्यक !

तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या छायाचित्रातून वातावरणात उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला, तसेच अन्य भारतीय शास्त्रीय नृत्यकला यांचा पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेला तौलनिक अभ्यास !

‘४.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात एका नृत्यसमूहाने ‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला सादर केली.

भारतीय शास्त्रीय संगीताची निर्मिती आणि तिची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

मन सात्त्विक अवस्थेत असतांना मुखावाटे किंवा वाद्य वाजवल्याने प्रगट होणारा नाद सात्त्विक असतो. या सात्त्विक नादालाच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, असे संबोधले जाते. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना, म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना आहे.

प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.