‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला, तसेच अन्य भारतीय शास्त्रीय नृत्यकला यांचा पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेला तौलनिक अभ्यास !

‘४.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात एका नृत्यसमूहाने ‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला सादर केली.

गोटिपुआ

गोटि या शब्दाचा अर्थ एक आणि पुआ या शब्दाचा अर्थ मुलगा आहे, म्हणजेच गोटिपुआ या शब्दाचा अर्थ एक मुलगा असा होतो. हिंदु संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार ईश्वराशी अनुसंधान साधणारे आहेत. त्यापैकी गोटिपुआ हा एक दुर्मिळ नृत्यप्रकार आहे.

नृत्य करण्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. त्या माध्यमातूनही ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा देशमुख) आणि डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी आरंभ केला आहे.