फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र

२६.१२.२०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता आणि २७.१२.२०१६ या दिवशी सायंकाळी ६.२० वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत स्थुलातील कोणत्याही कारणाशिवाय फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध आला. दोन्ही दिवशी सुगंध १५ – २० मिनिटे येत होता. फणसाचा हंगाम नसतांनाही खोलीमध्ये हा गंध पसरण्याचे कारण येथे दिले आहे.

 

१. खोलीत फणसाचा हंगाम नसतांना गोड सुगंध येणे,
हे प्रतिकूल काळात अनुकूल काळाचे अंशात्मक प्रकटीकरण होत असल्याचे दर्शक असणे

श्री. राम होनप

गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या गर्‍याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते. सध्या काळ प्रतिकूल आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी वास्तव्यात काळात परिवर्तनाची क्षमता आहे. त्यामुळे फणसाचा हंगाम नसतांना गोड सुगंध येणे, हे प्रतिकूल काळातील अनुकूल काळाचे अंशात्मक प्रकटीकरण आहे. दैवी गंधाच्या प्रकटीकरणाच्या रूपाने गंधऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काळात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेत साथ देत असल्याचे लक्षण आहे.

 

२.गंधाचे प्रकटीकरण वाढत असल्याचे दर्शक

फणसाचा हंगाम नसतांना गोड सुगंध दुसर्‍या दिवशीही येणे आणि तो वातावरणात टिकून रहाणे, हे गंधाचे प्रकटीकरण वाढत असल्याचे दर्शक आहे.

 

३. वातावरणात दैवी गंधाच्या प्रकटीकरणाने होणारे लाभ

३ अ. वातावरणाची शुद्धी होणे

‘गंधातून सत्त्वगुणाची निर्मिती होऊन वातावरणाची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

३ आ. दिव्यात्म्यांना आणि दैवी शक्तींना कार्य करण्याची प्रेरणा मिळणे

गंधाच्या प्रकटीकरणामुळे वातावरणातील अकार्यरत शक्ती कार्यरत होऊन ईश्‍वरी कार्यात सहभागी होण्यास सिद्ध होतात. गंधाच्या माध्यमांतून दिव्यात्म्यांना किंवा दैवी शक्तींना कार्य करण्याची प्रेरणा मिळते. गंध मनुष्याला आकृष्ट करतो, त्याप्रमाणे तो दैवी शक्ती आणि दिव्यात्मे यांना कार्य करण्यास प्रेरणा देतो आणि उद्युक्त करतो. गंधाच्या या वैशिष्ट्याला ‘गंधाकर्षण तत्त्व’, असे म्हणतात.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०१७)

 

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांच्या अनुभूती’, यांचा अभ्यास करण्यासंदर्भात साहाय्य करा !

‘आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला ‘योग्य कि अयोग्य ?’, असे म्हणता येत नाही. ‘ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?’, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर ‘अयोग्य काय ?’, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.’

– संपादक, सनातन प्रभात

Leave a Comment