कर्नाटकातील संडूर येथील डॉ. व्ही.टी. काळे यांनी भावपूर्ण रेखाटलेल्या तैलचित्रांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

संत भक्तराज महाराज
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

‘कर्नाटक राज्यातील बेळ्ळारी जिल्ह्यातील संडूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. व्ही.टी. काळे यांनी काही दिवसांपूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे त्या स्वतः, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांची चित्रे काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना पाठवलेल्या छायाचित्रांवरून त्यांनी तैलचित्रे रेखाटली. ही तैलचित्रे सुंदर आणि हुबेहूब झाली आहेत. त्यांच्याकडे पाहून आध्यात्मिक स्तराच्या विविध अनुभूती येतात. तसेच ‘ती चित्रे नसून प्रत्यक्ष त्या व्यक्तीच आपल्यासमोर आहेत’, असे जाणवते; म्हणून या चित्रांना ‘सजीव चित्रे’ संबोधणे अधिक योग्य ठरेल.

या चित्रांना जवळून पाहिले असता कदाचित त्यांतून स्पदनांचे प्रमाण आपल्याला एवढे जाणवणार नाही; परंतु ४ – ५ फुटांवरून चित्रांकडे पाहिले असता त्यांतून आपल्याला चित्रांतील व्यक्तींचा भाव आणि त्यांच्या अवयवांमध्ये होणार्‍या हालचाली यांची जाणीव होते. तसेच त्या तीन चित्रांपैकी एखाद्या चित्राकडे पहात त्या चित्राच्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे चालून पाहिल्यास चित्रातील अवयवांमध्ये हालचाल होतांना जाणवते. चित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्या चित्राच्या लांबून जवळ जातांना हात चित्रासमोर धरल्यास काही अंतरावर तळहाताला चित्रातून प्रक्षेपित होणारी स्पंदने जाणवू लागतात. अशा प्रकारे या चित्रांचा अभ्यास करतांना त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि काही जणांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे देत आहे.

 

१. चित्रांतील स्पंदने

चित्रकाराने भावपूर्ण काढलेल्या या चित्रांतून सगुण-निर्गुण स्पंदने पुढीलप्रमाणे जाणवली

‘सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्रातून सगुण तत्त्वाचे प्रक्षेपण होते, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्रातून सगुण-निर्गुण तत्त्वाचे प्रक्षेपण होते, तर संत भक्तराज महाराज यांच्या चित्रातून निर्गुण तत्त्वाचे प्रक्षेपण होते.’ यानुसार चित्रांची पुढील वैशिष्ट्ये जाणवली.

 

२. चित्रांतील अवयवांची हालचाल

चित्रकारात असणार्‍या भावामुळे ज्या वेळी तो भावपूर्ण कलाकृती रेखाटतो, त्या वेळी चित्रातील त्या त्या अवयवाचा संबंधित पंचतत्त्वाशी संयोग झाल्यामुळे (उदा. डोळ्यांचा तेजतत्त्वाशी) ते ते अवयव हलतांना आणि दिशा पालटतांना दिसतात. तसेच चित्रामध्ये कार्यरत झालेल्या चैतन्यामुळे चित्र द्विमितीतून त्रिमितीत जागृत झाल्याचे जाणवू लागते. कधीकधी कार्याच्या आवश्यकतेप्रमाणेही पंचतत्त्वाचा संयोग होऊन व्यक्तीच्या चित्रातील एखादा अवयव जिवंत वाटतो.

टीप १ – चित्रांतील डोळ्यांची हालचाल अधिक प्रमाणात होण्याची कारणमीमांसा : तेजतत्त्वसदृश कार्याची आवश्यकता असल्यास चित्रात जिवंतपणा येतांना तो प्रथम डोळ्यांमध्ये येतो; कारण तेजतत्त्वाला प्रतिसाद देतांना डोळे सर्वाधिक प्रमाणात तेजतत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करू शकतात.

टीप २ – चित्रांतील व्यक्तींच्या छातीच्या भागाकडे पाहिल्यावर ‘चित्रांतील व्यक्ती श्‍वास घेत आहेत’, असे वाटणे : ज्या वेळी ‘चित्रातील व्यक्ती श्‍वास घेत आहे’, असे वाटते, त्या वेळी ते चित्र चैतन्याने अगदी अंतर्बाह्य भारीत झालेले असल्याने तसे जाणवते. तसेच श्‍वासोच्छ्वासाच्या गतीवरून ‘चित्रामध्ये त्या स्थितीला कोणती स्पंदने कार्यरत आहेत ?’, ते लक्षात येते.

२ अ. व्यक्तीच्या चित्रातील वायूतत्त्वाचे प्रमाण आणि जाणवणारा जिवंतपणा

आपला जसा भाव, तसा आपल्यावर एखाद्या चित्रातील तत्त्वांचा अथवा चित्रातील व्यक्तीच्या अवयवांचा परिणाम होतो, म्हणजे त्या चित्रातील चैतन्य आपल्याला देवतेकडून प्रदान केले जाते.

 

३. चित्रांतील पार्श्‍वभूमी

टीप – एखाद्या सामान्य निर्जीव वस्तूची स्पंदने आणि एखादी वस्तू किंवा व्यक्ती हिच्यातील निर्गुण स्पंदने यांतील भेद : संत भक्तराज महाराजांच्या चित्राकडे पाहिले असता त्या चित्रातून काही वेळा शांत आणि स्थिर जाणवते, तर काही वेळा काहीच जाणवत नाही. एखाद्या निर्जीव वस्तूकडे पाहिल्यावर आपल्याला काहीच जाणवत नाही, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या स्पदनांकडे पाहून आपल्याला काहीच जाणवत नाही; परंतु तरीही त्यामध्ये असे काहीतरी असते की, त्यातून आपली भावजागृती होते किंवा आपल्याला आनंद जाणवतो आणि मन त्याकडे आकृष्ट होते. हाच सामान्य निर्जीव वस्तू आणि निर्गुण स्तराची वस्तू किंवा व्यक्ती यांतील भेद आहे.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.११.२०१७)

तैलचित्रांच्या संदर्भातील अनुभूती

कर्नाटकातील संडूर येथील डॉ. व्ही.टी. काळे यांनी संत भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रेखाटलेल्या चित्रांविषयीच्या अनुभूती

१. संत भक्तराज महाराज : ‘संत भक्तराज महाराज यांच्या चित्राकडून पुष्कळ थंड लहरी प्रक्षेपित होत होत्या. त्यांच्याकडे बघून शांत वाटत होते. ‘त्यांच्याकडे आपण आकर्षिले जात आहोत’, असे जाणवले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष तिथे आहेत’, असे जाणवले. त्यांची स्पंदने जाणवत होती. त्यांच्या अवयवांची, उदा. डोळे, तोंडवळा इत्यादींची हालचाल होतांना जाणवली.

३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ : ‘या चित्रातून चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवले, तसेच चित्रामध्ये पुष्कळ जिवंतपणा जाणवला.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०१७)

Leave a Comment