एखाद्याला नामजपादी उपाय शोधून देतांना त्या व्यक्तीचा त्रास, त्याची आध्यात्मिक पातळी, वाईट शक्ती करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करा !

त्रास होणारे साधक किंवा संत यांची आध्यात्मिक पातळी, ते करत असलेले समष्टी कार्य, त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास, वाईट शक्ती त्यांच्यावर करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करून नामजप, करावयाची बोटांची मुद्रा आणि त्या मुद्रेने करावयाचा न्यास शोधून द्यावा.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप – ३

दमा, मूत्रवहन संस्थेमध्ये संसर्ग होणे, शरीरात एखाद्या ठिकाणी दाह होणे, ‘स्लिप डिस्क’ मुळे होणाऱ्या वेदना अल्प होण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, ओ.सि.डी., सर्व प्रकारचे मानसिक विकार, कारण नसतांना अंगाला खाज सुटणे अशा २० विकारांवर उपयुक्त देवतांचे नामजप.

एखाद्या वस्तूवर जलद गतीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची पद्धत

‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’

‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्‍या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप – २

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता.

साधकाने दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना आणि दृष्ट काढतांना करायचा नामजप !

ज्या साधकाची दृष्ट काढायची आहे आणि जो साधक दृष्ट काढणार आहे, त्यांनी करायची प्रार्थना आणि नामजप यांची माहिती लेखात देण्यात आली आहे.

वास्तू-विक्री यंत्र

‘सध्या साधकांना त्यांची वास्तू विकतांना पुष्कळ अडचणी येत आहेत’, असे अनेक साधकांच्या उदाहरणांतून लक्षात आले. ‘वास्तु-विक्रीतील अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय असल्यास सुचव’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने वास्तू-विक्रीतील अडथळे दूर होण्यासाठी ‘वास्तू-विक्री यंत्र’ सुचवले.

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप – १

काही विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.

आपत्काळात मीठ-मोहरीची टंचाई असतांना दृष्ट काढण्याची पद्धत

मी एक प्रयोग म्हणून ‘दोन्ही हातांच्या मुठींमध्ये प्रत्यक्ष मीठ-मोहरी न घेता ते दोन्ही घटक मुठींमध्ये असल्याचा भाव ठेवून त्या साधकाची दृष्ट काढल्याने काय परिणाम होतो ?’, हे बघण्याचे ठरवले.