आगामी भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रतिदिन करावयाचा मंत्रजप

आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.

‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात’, याचा अभ्यास करून वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास ती दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करा !

‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते.

स्त्रियांनो, मासिक धर्माशी संबंधित त्रास होत असल्यास पुढील आध्यात्मिक उपाय करा !

सध्याच्या काळात बर्‍याच स्त्रियांना मासिक धर्माशी संबंधित त्रास होत आहेत. यामध्ये रजस्राव अधिक प्रमाणात होणे, रजस्राव प्रतिमास न होता अनियमित होणे, २० व्या दिवशी रजस्राव चालू होऊन तो १५ दिवस रहाणे, असे त्रास होत आहेत. त्यामुळे मासिक धर्माच्या संदर्भात त्रास होत असल्यास स्त्रिया पुढील आध्यात्मिक उपाय करु शकतात. यासंदर्भात काही औषधे चालू असल्यास ती बंद न करता त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक उपाय करु शकतो.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. नामजपाचे मंडल काढून त्यात लिहावयाची प्रार्थना

मासिक धर्म चालू होण्याच्या दिनांकाच्या ४ दिवस आधी कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढावे आणि त्यामध्ये पुढील प्रार्थना लिहावी, ‘हे श्रीकृष्णा, …….. (येथे स्वतःचे नाव लिहावे.) हिला मासिक धर्माच्या संदर्भात ……. (जे त्रास होत आहेत, ते येथे लिहावेत.) हे त्रास होत आहेत. हे त्रास दूर होऊ देत आणि मला दिलेली सेवा अन् साधना करता येऊ दे. तिच्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत.’

रजस्राव थांबल्यावर नामजपाचे मंडल केलेला कागद अग्नीमध्ये विसर्जित करावा. पुढच्या मासामध्ये असे नामजपाचे मंडल पुन्हा बनवावे आणि त्यात प्रार्थना लिहावी. हे उपाय मासिक धर्म नियमित होईपर्यंत प्रतिमास करावेत.

 

२. या काळात करावयाची मुद्रा, न्यास आणि नामजप

२ अ. मुद्रा आणि न्यास : अंगठ्याचे टोक तर्जनीच्या मुळाशी लावून सिद्ध होणारी मुद्रा दोन्ही हातांनी करून एका हाताच्या तर्जनीच्या टोकाने स्वाधिष्ठानचक्र आणि दुसर्‍या हाताच्या तर्जनीच्या टोकाने आज्ञाचक्र या ठिकाणी न्यास करणे

२ आ. नामजप : वरील मुद्रा आणि न्यास करून त्यांसह ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप त्रास होत असतांना किंवा मासिक धर्माच्या दिनाच्या ४ दिवस आधीपासून ते मासिक धर्माचा ५ दिवसांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन २ घंटे करावा.

२ इ. हे उपाय करूनही रजस्राव थांबत नसेल किंवा त्याचे प्रमाण अधिक असेल, तर ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप करावा, तसेच तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी टेकवून सिद्ध होणारी मुद्रा दोन्ही हातांनी करून एका हाताच्या अंगठ्याच्या टोकाने स्वाधिष्ठानचक्र आणि दुसर्‍या हाताच्या अंगठ्याच्या टोकाने आज्ञाचक्र या ठिकाणी न्यास करावा.

मासिक धर्माच्या वेळी असे त्रास नेहमी होत असल्यास प्रत्येक वेळी वरील उपाय करावेत.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट

‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

साधकाकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे त्रासदायक पालट होऊन ते छायाचित्र काही वर्षांनी अधिकाधिक विद्रूप होत जाणे

‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील आसुरी शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.

१.१.२०१९ ते ३१.१२.२०१९ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय

‘देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी चित्रांचा नव्हे, तर नामपट्टीचा उपयोग करावा.

आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !