वास्तू-विक्री यंत्र

Article also available in :

‘सध्या साधकांना त्यांची वास्तू विकतांना पुष्कळ अडचणी येत आहेत’, असे अनेक साधकांच्या उदाहरणांतून लक्षात आले. ‘वास्तु-विक्रीतील अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय असल्यास सुचव’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने वास्तू-विक्रीतील अडथळे दूर होण्यासाठी ‘वास्तू-विक्री यंत्र’ सुचवले. यंत्राचे (३ x ३ इंच आकारातील) चित्र समवेत दिले आहे. एका कोर्‍या कागदावर वास्तू-विक्री यंत्राची (चित्राची) रंगीत संगणकीय प्रत (प्रिंट) काढावी. हे यंत्र वास्तूच्या वायव्य दिशेच्या भिंतीवर साधारण ५ फूट उंचीवर लावावे. (वायव्य दिशेला शौचालय येत असल्यास तो भाग सोडून यंत्र शेजारील भिंतीवर लावावे.) हा उपाय पंचांगात शुभ दिवस पाहून आरंभ करावा. यंत्र लावल्यावर त्याला प्रतिदिन उदबत्तीने ओवाळून पुढील प्रार्थना करावी. ‘वास्तू-विक्रीतील सर्व अडथळे दूर होऊन वास्तूची लवकरात लवकर विक्री होऊ दे.’ वास्तूची विक्री झाल्यानंतर हे यंत्र कृतज्ञता व्यक्त करून अग्नीसमर्पण करावे.’

– श्री. धनंजय कर्वे (१.२.२०२१)

Leave a Comment