मनुष्याला रात्री वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

पृथ्वीवरील ज्या भूभागांवर सूर्यप्रकाश पडतो, त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ सूर्याचा वातावरणावरील परिणाम सूक्ष्म रूपाने टिकून असतो; कारण सूर्यप्रकाशात दैवी अस्तित्व असते. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्तींना सूर्यप्रकाश असलेल्या भूभागांवर कार्य करणे कठीण जाते.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.