भारतात कोरोनामुळे जून 2021 पासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल. रामजन्मभूमीतही राममंदिर उभे रहात आहे. राममंदिरासह रामराज्याची स्थापना होऊन सर्वांचे सार्थक होईल. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन बडास्थान (अयोध्या) येथील रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज यांनी केले. येथील चालू असलेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली.

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून प्रसिद्धी

कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅपचा गट बनवण्यात आला आहे  या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.

जगावरील विनाशकारी संकटे !

सध्या संपूर्ण विश्‍वात, तसेच भारतातही आपत्काळाला प्रारंभ झाला आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा संपूर्ण विश्‍वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

रामनाथी (गोवा) – हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेचे कु. विश्‍व अय्या यांनी केले. या वेळी … Read more

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’ने वर्तवली आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलीदान द्यावे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अहवालाला जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना गंभीरपणे घेतात

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

कुंभमेळ्यामधील मानाच्या विविध आखाड्यांचे साधूसंत यांच्यासह लाखो भाविकांनी गंगेमध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशीचे दुसरे पवित्र स्नान केले. या प्रसंगी ‘हरकी पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.

आपला शेजारी किंवा इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्ण आढळल्यास काय काळजी घ्यावी ?

कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) असलेल्या रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराशी संपर्क टाळावा.