श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पार पडला ‘ऑनलाईन’ सोहळा !

गतवर्षीपासून कोरोनाचे संकट चालू झाल्यामुळे प्रत्येकच सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने येत आहेत. असे असले तरी धर्मप्रेमींसाठी श्रीरामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या मनामनांत श्रीराम असल्याने या उत्सवास धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत आहेत ! – देवी श्री विद्यानंद सरस्वती

राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जसे धर्माचरणाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे, त्यानुसार आम्हीही आपल्या वैदिक धर्माचा, यज्ञ अन् गायत्री मंत्र यांचा प्रसार करतो. आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हिंदु संस्कृती आणि धमार्र्चरण यांची आवश्यकता पटवून दिली आहे. सध्या समाजात धर्मप्रसाराची पुष्कळ आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कच्छ येथील देवी श्री विद्यानंद सरस्वती (आदिशक्ति गुरु माँ) यांनी केले.

भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेले ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याविषयीचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे ठाम मत झाले आहे की, भारत हिंदु राष्ट्र होणार आहे. आजही हिंदुत्वावर काम करणारे अनेक लोक स्वत:ला निधर्मी समजत आहेत. अशा वेळी समिती आणि संस्था यांच्या वतीने प्रदर्शन, संवाद, प्रवचन, सत्संग या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य प्रभावीपणे चालू आहेे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले.

भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अभ्यासात दुसर्‍या लाटेचा सामना करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.

भयावह ‘विक्रम’ !

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्‍यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.

सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !

सौदी अरेबियाने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत अन्य देशांचा इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले.

‘ऑक्सिजन’चा आपत्काळ !

‘ऑक्सिजन’ या सूत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची आणि त्याला ‘बहुमूल्य’ समजण्याचीच वेळ निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अत्यावश्यक उपाययोजनांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस यांच्या जोडीला ऑक्सिजनचाही समावेश आहे.

हे कार्य आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज, पंचदशनाम आवाहन आखाडा, ब्यावरा, मध्यप्रदेश

हे कार्य, फलकांवरील लिखाण आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे. हे कार्य सर्वांनीच केले पाहिजे. आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे, असे प्रतिपादन पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज यांनी केले.

भारतात कोरोनामुळे जून 2021 पासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.