जगावरील विनाशकारी संकटे !

सध्या संपूर्ण विश्‍वात, तसेच भारतातही आपत्काळाला प्रारंभ झाला आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा संपूर्ण विश्‍वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे. ‘पृथ्वीवर सुनामी, भूकंप इत्यादी अनेक भयानक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. त्यामुळे ‘पृथ्वीही सोडायची वेळ येईल’, असे शास्त्रज्ञही सांगत आहेत. या आपत्काळाचा अनुभव संपूर्ण मानवजातीला दिवसेंदिवस येतच आहे. त्यातूनच त्याच्या पुढील भीषणतेची कल्पना करता येईल. अशा घटनांची काही अत्यल्प उदाहरणे…

१. ‘२३ जुलै २०१३ या दिवशी अतीविशाल सौर ज्वाळेतून पृथ्वी थोडक्यात बचावली, असे ‘नासा’ ने सांगितले.

२. ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ने सहस्रो पशूपक्षांच्या जातींची संख्या न्यून होण्याला ‘जागतिक महामारी’ संबोधले आणि हा पृथ्वीच्या ६ व्या महाविनाशाचा भाग असल्याचे म्हटले.

३. २९ एप्रिल २०२० या दिवशी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीवर पडण्याची शक्यता होती; परंतु ते संकट टळले.

४. येत्या भीषण आपत्काळात ग्रह-तारे यांच्या माध्यमांतूनही अनर्थ होईल, अशा स्वरूपाच्या घटना घडतील, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

५. २०१९ ते २०२० या वर्षाच्या काळात चीनला सर्वाधिक म्हणजे ५७७ नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. जगात ७ सहस्र ३४८, तर भारतामध्ये ३२१ नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आकडेवारीनुसार यात १.२३ दशलक्ष लोकांना जीव गमवावा लागला, तर ४.२ अब्ज लोक बाधित झाले.

६. जगभरात कॅलिफोर्निया, आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका आदी ठिकाणी मोठ्या आगी लागल्या. त्यात ३ अब्जांहून अधिक प्राणी नष्ट झाले. लाखो लोक बेघर झाले.

७. गेल्या काही वर्षांत जगभरात चक्रीवादळांनी थैमान घातले आहे. वादळे आणि हिमवर्षाव यांनी अमेरिकेसारखा श्रीमंत देशही ग्रासला. जगात एकीकडे पूर, तर दुसरीकडे उष्मालाटा अशी विचित्र स्थिती निर्माण होत आहे.

८. वर्ष २०१५ तील नेपाळमधील भूकंप आणि २०१७ मधील केदारनाथमधील प्रलय अजून जनता विसरलेली नाही.

९. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. मुंबईतील समुद्र अलीकडे येत असल्याचे स्थानिक अनुभवत आहेत.

१०. भारतात सुका आणि ओला दुष्काळ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अद्याप रोखू शकलेला नाही.

११. चीनमध्ये सध्या धुळीचे वादळ आले आहे.

 

‘कोरोना’ची आपत्ती म्हणजे भावी महाभीषण आपत्काळाची झलक !

‘फेब्रुवारी २०२० पासून ‘कोरोना’ विषाणूने जगभरात हाहाःकार माजवला. हा मंद आपत्काळ जगाने अनुभवला असे म्हणू शकतो. १ वर्षानंतर त्याची लस उपलब्ध होऊनही ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग संपत नाही. आतापर्यंत जगात २६.६ लाखांहून अधिक, तर भारतात १ लाख ५९ सहस्रांहून अधिक लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडले. कोरोनाच्या आपत्तीत लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होऊन देशात आर्थिक मंदी, बेरोजगारी त्यातून गुन्हे, आत्महत्या आदी भीषण समस्या उद्भवल्या. नागरिक देश-विदेशांत अडकल्याने त्यांनी हानी झाली. कोरोनाचा निर्माणकर्ता आणि विस्तारवादी चीनला दिवसेंदिवस अनेक शत्रू निर्माण होत आहेत. ते एकमेकांना सतत धमक्या आणि चेतावणी देत आहेत. आगामी संकट ओळखून चीनही स्वतःची युद्धसिद्धता करत आहे. ही स्थिती जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटू शकते. अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे की, कालमहात्म्यानुसार विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. जगाची अर्धी लोकसंख्या नष्ट होणार आहे. तिसर्‍या महायुद्धाचा परिणाम पुढील ३० वर्षे जाणवेल आणि पुन्हा घडी बसण्यासाठी १०० वर्षे लागतील !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment