
हरिद्वार – सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून लेख स्वरूपात प्रसिद्धी देण्यात आली आहे. कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअॅपचा गट बनवण्यात आला आहे या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.
या गटातील लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, १२ वर्षांतून एकदा येणार्या या कुंभमेळ्यामध्ये हिंदु संस्कृतीचा प्रचार-प्रसार सनातनच्या ग्रंथांद्वारे उत्तम प्रकारे केला जात आहे. गोेवा येथील सनातन संस्थेच्या वतीने कुंभक्षेत्रामध्ये १०० स्वयंसेवक हा प्रचार करत आहेत.
‘देवतांची उपासना कशी करावी’, ‘जीवनात आनंद प्राप्तीसाठी कोणती साधना करावी’ यांसह अन्य ग्रंथांच्या माध्यमातून भाविकांना ग्रंथ वाचनातून धर्माचरण करण्याची मोठी पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, भ्रमणभाष, इंटरनेट यांच्या अतीवापराचे दुष्परिणाम या विषयीच्या ग्रंथाचा उल्लेख करून सचिन नावाच्या भाविकाने सध्याच्या काळात या ग्रंथांची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे. कुंभला येऊन हा ग्रंथ मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे कुंभनगरीमध्ये सनातन संस्थेद्वारे अगदी प्रत्येक भागात धर्म, संस्कृती प्रचाराचे कार्य केले जात असल्याचा उल्लेख या लेखामध्ये करण्यात आला आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! –...
‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !