दरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदु राष्ट्राविषयी संपर्क अभियान
आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले.