धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय – सौ. विदुला हळदीपूर, सनातन संस्था

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी युवकांनी सिद्ध व्हावे ! – पू. स्वामी लिंगानंद प्रभु

कित्तूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभेत हिंदु ऐक्याचे दर्शन

वर्ष २०१८ चे कन्नड सनातन अ‍ॅण्ड्रॉईड पंचांगचे प्रकाशन करतांना (मध्यभागी) पू. स्वामी लिंगानंद प्रभु, डावीकडे सौ. विदुला हळदीपूर आणि उजवीकडे श्री. व्यंकटरमण नाईक

कित्तूर  – राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी युवकांनी सिद्ध झाले पाहिजे. याविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे कार्य युवकांनी केले पाहिजे, असे उद्गार पू. स्वामी लिंगानंद प्रभु यांनी येथे काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. ‘प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक आहे. आपण गुरूंना शरण जाऊन साधना केली पाहिजे’, असे पू. लिंगनाद प्रभु म्हणाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. व्यंकटरमण नाईक आणि सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर व्यासपिठावर उपस्थित होत्या. पू. स्वामी लिंगानंद प्रभु यांच्या हस्ते या वेळी ‘कन्नड सनातन अ‍ॅण्ड्रॉईड पंचांग २०१८’ चे प्रकाशन करण्यात आले.

सनातनच्या सौ. विदुला हळदीपूर म्हणाल्या, ‘‘सध्या हिंदु संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात अवमान केला जात आहे. धर्माचरणानेच धर्माची पुनर्स्थापना होणार आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय.’’

हिंदु जनजागृती समितीचे श्री. व्यंकटरमण नाईक यांनी ‘देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, गोहत्या, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, राष्ट्रपुरुष आणि देवता यांची विटंबना यांच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment