वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रात धर्मप्रेमी हिंदूंचे रामरायाच्या चरणी साकडे !

अनेक ठिकाणी शोभायात्रांमध्ये सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मंदिरांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. शेकडो ठिकाणी फलकलिखाण करून प्रवचने, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे साधना सत्संग शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !

सनातन संस्थेचे श्री. सम्राट देशपांडे यांनी या शिबिराचा उद्देश सांगितला. त्यानंतर काही जिज्ञासूंनी साधना सत्संगात सहभागी झाल्यानंतर त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांच्या जीवनात झालेले आमूलाग्र पालट यांविषयी अनुभवकथन केले.

मुलुंड (मुंबई) येथे ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले !

सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे २९ मार्च या दिवशी ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथील ‘मुलुंड सेवा संघा’च्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हिदूंचा नववर्षारंभ शोभायात्रा आणि गुढीपूजन यांनी साजरा !

मुंबई आणि पालघर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा ७ ठिकाणी आदर्श गुढीपूजन आणि ४ ठिकाणी शोभायात्रेत सहभाग ! माहीम येथील शोभायात्रेत स्वरक्षण प्रात्यक्षिके ! मुंबई – येथील गोरेगाव, माहीम, घाटकोपर, कांजुरमार्ग, भांडुप, नवी मुंबई येथील नेरूळ आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथे विविध संघटनांच्या वतीने सामूहिक गुढी पूजन करण्यात आले. या ठिकाणी हिंदु जनजागृती … Read more

स्वत:मधील शिवतत्त्व, दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपण ज्या देशात जन्मलो त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे असेल, तर पुरुषांची त्यांच्यातील शिवतत्त्व आणि महिलांनी त्यांच्यातील दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात बोलत होत्या.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक प्रमाणात धर्मप्रसार !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी, सामूहिक गुढी, सामाजिक माध्यम यांद्वारे व्यापक प्रमाणात धर्मप्रसार करण्यात येत आहे. या कार्यात धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग आहे.

हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु स्त्री धर्मशिक्षित असल्यास तिचे पूर्ण कुटुंब धर्माचरणी होते, हे राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदु स्त्रियांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटापासून कुटुंबाचे रक्षण होईल.