धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग !

कोल्हापूर- हिंदूंचे नववर्ष गुढीपाडव्याचे शास्त्र अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी, सामूहिक गुढी, सामाजिक माध्यम यांद्वारे व्यापक प्रमाणात धर्मप्रसार करण्यात येत आहे. या कार्यात धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग आहे.यळगुड (जिल्हा कोल्हापूर) येथे विठ्ठल मंदिरात जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना धर्मप्रेमी सौ. वैशाली माने आणि उपस्थित जिज्ञासू


१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उंचगाव येथील रिक्शांवर, तसेच रुईकर कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे भीत्तीपत्रके लावण्यात आली.

२. जत्राट (कर्नाटक) येथे धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन गुढीपाडव्याचे प्रबोधन करणारी भीत्तीपत्रके लावली.


३. यळगुड (जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले) येथे विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमी सौ. वैशाली माने आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी गुढीपाडवा कसा साजरा करावा ?, तसेच साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
४. कोल्हापूर येथील त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी त्यांच्या रुग्णालयात गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेला सत्संग दूरचित्रवाहिनीवर लावला होता. त्यामुळे अनेक रुग्णांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य झाले.
५. सांगली येथील स्थानिक ‘सी’ केबलच्या ‘भक्ती’ वाहिनीवर आणि कोल्हापूर येथील ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवर सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या विशेष धर्मसत्संगाचे प्रक्षेपण करण्यात आले. यामुळ लाखो लोकांपर्यंत विषय पोचवणे शक्य झाले.
६. सांगली-कोल्हापूर येथील अनेक फलकांवर गुढीपाडव्याचे शास्त्र सांगणारा मजकूर लिहिण्यात आला होता.
७. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारण्यात येणार आहे.




मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला