
कोल्हापूर – श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी, प्रवचन, सामूहिक नामजप यांचेही आयोजन करण्यात आले होते.
१. चोकाक येथील श्री विठ्ठल मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनी ‘श्रीराम’ आणि श्रीरामनवमीचे महत्त्व याविषयावर प्रवचन घेतले. याचा लाभ ७० भाविकांनी घेतला. येथे धर्मशिक्षणविषयक फलकही लावण्यात आले होते. येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनीही मार्गदर्शन केले.

२. हालोंडी येथे धर्मप्रेमी सौ. वंदना कोळी यांनी महिलांनी एकत्र येऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप केला.
३. वारणानगर येथील कक्षास आमदार विनय कोरे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती.
सांगली जिल्हा

तासगाव येथे भाजपचे खासदार श्री. संजय पाटील यांनी, तर सांगली येथे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी सदिच्छा भेट दिली.


सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !