हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सभेमध्ये मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये आणि बसलेले श्री. हर्षद खानविलकर

म्हैसगाव (जिल्हा सोलापूर) – हिंदु स्त्री धर्मशिक्षित असल्यास तिचे पूर्ण कुटुंब धर्माचरणी होते, हे राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदु स्त्रियांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटापासून कुटुंबाचे रक्षण होईल. प्रत्येक हिंदूने साधना करून ईश्वराचे भक्त बनून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. २४ मार्च या दिवशी म्हैसगाव (तालुका माढा) येथील पवारवस्ती येथे हनुमान मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

सभेला उपस्थित धर्मप्रेमी नागरिक

सभेच्या प्रारंभी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. आप्पासाहेब उबाळे हेही उपस्थित होते. सभेच्या समारोपप्रसंगी श्री. मिनेश पुजारे यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली. सभा झाल्यानंतर अनेक जिज्ञासूंनी वक्त्यांशी संवाद साधला.

 

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातून सर्वत्रच्या
हिंदूंनी जागृत व्हावे ! – हर्षद खानविलकर, हिंदु जनजागृती समिती

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातून सर्वत्रच्या हिंदूंनी जागृत होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे, तसेच प्रत्येक हिंदु युवक आणि युवती यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे.

विशेष

१. सभेच्या दिवशी पवारवस्तीमधील प्रत्येक घरासमोर सणांना काढतात, त्याप्रमाणे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सभेच्या दिवशी संपूर्ण गावात उत्सवाचे स्वरूप आले होते.

२. गावातील अनेकांनी सभेला उपस्थित रहाता यावे, यासाठी शेतीची कामे पहाटे आणि एक दिवस आधी पूर्ण केली होती.

३. सभेचा प्रसार आणि सभेची पूर्वसिद्धता धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी महिला अन् पुरुष यांनी पुष्कळ तळमळीने केली होती.

Leave a Comment