मिरज येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्‍साहात पार पडले !

येणार्‍या आपत्‍काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्‍ध न झाल्‍यास उपचार करण्‍यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्‍यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्‍यात आले.

अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग

या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्‍हावे, गोमातेला राष्‍ट्रमाता म्‍हणून घोषित करण्‍यात यावे आणि ‘संस्‍कृत भाषा हीच आपली संस्‍कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.

कोल्‍हापूर येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ !

सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्‍णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले.

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज् संस्‍थेच्‍या वतीने आयोजित महोत्‍सवात सनातन संस्‍थेचे सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ प्रदर्शन !

या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज्‌चे संस्‍थापक तसेच बळीराज सेनेचे अध्‍यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्‍यात आला.

ठाणे येथे सनातन संस्‍था आयोजित ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्‍साही वातावरणात पार पडले !

शिबिरामध्‍ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्‍या त्रासांवर चेहर्‍यावरील बिंदूदाबन शिकवण्‍यात आले.

सनातन संस्‍था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा सोलापूर येथील ३४ शिबिरार्थींनी घेतला लाभ, तर ७४ जणांवर उपचार !

पुढे येणार्‍या भीषण आपत्‍काळात रुग्‍णांना होणार्‍या वेदना न्‍यून होण्‍यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्‍यक आहे. यासाठी सनातन संस्थेने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते.

ठाणे आणि नवीन पनवेल येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

शिबिरात आलेल्‍या रुग्‍णांवर गुडघेदुखी, मणक्‍याचे त्रास, फ्रोजन शोल्‍डर या त्रासांवर उपचार करण्‍यात आले. उपचारानंतर त्‍यांचा त्रास उणावल्‍याचे रुग्‍णांच्‍या लक्षात आले.

हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले