स्वत:मधील शिवतत्त्व, दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथे साधना सत्संग जिज्ञासू शिबिर

शिबिरात दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि श्री. अमोल कुलकर्णी (उजवीकडे)

कोल्हापूर – जो भारत कधीकाळी विश्वगुरु म्हणून ओळखला जात असे, तो देश सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. आपण ज्या देशात जन्मलो त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे असेल, तर पुरुषांची त्यांच्यातील शिवतत्त्व आणि महिलांनी त्यांच्यातील दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या २९ मार्च या दिवशी खरे मंगल कार्यालयात साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी उपस्थित होते. या शिबिरासाठी सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथून जिज्ञासू महिला आणि पुरुष उपस्थित होते.

शिबिराच्या समारोपप्रसंगी जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (मध्यभागी), आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (डावीकडे) आणि श्री. अमोल कुलकर्णी (डावीकडे)

शिबिराच्या प्रारंभी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर सौ. राजश्री तिवारी आणि श्री. अमोल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात अनिष्ट शक्तींचे त्रास कसे होतात आणि त्यावरील उपाययोजना, ‘हलाल’ विषय, तसेच साधनाविषयक अन्य विषय यांवर मार्गदर्शन करण्यात आले. जिज्ञासूंसाठी गटचर्चा घेण्यात आली.

शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करतांना श्री. विलास वेसणेकर

 

विशेष

१. या शिबिरासाठी महिला जिज्ञासूंची उपस्थिती लक्षणीय होती. शिबिरात येण्यासाठी अनेक अडचणींवर मात करत जिज्ञासू महिला या शिबिरासाठी आल्या होत्या.

२. अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या संदर्भात सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये मार्गदर्शन करतांना सर्वांनी अत्यंत जिज्ञासेने विषय जाणून घेतला, तसेच लिहूनही घेतला.

३. मनोगत व्यक्त करतांना अनेकांना भावाश्रू अनावर झाले. त्यामुळे ते बोलू शकले नाहीत.

शिबिरात गटचर्चेत सहभागी जिज्ञासू
शिबिरात गटचर्चेत सहभागी जिज्ञासू

 

सकाळच्या सत्रातील काही जिज्ञासूंचे मनोगत

१. सौ. अपर्णा कुलकर्णी, कोल्हापूर – पूर्वी स्वभाव चिडचिडा होता. यात आता पुष्कळ पालट झाला आहे. साधना सत्संगामुळे व्यक्तीमत्त्व विकास झाला, तसेच आत्मविश्वास वाढला.

२. सौ. अर्चना मिसाळ, इचलकरंजी – शिबिराच्या ठिकाणी येण्यात पुष्कळ अडथळे आले. अडथळे दूर करण्यासाठी सांगितलेला नामजप केला आणि येथे येऊ शकले. त्यामुळे प्रार्थना आणि नामजपात किती शक्ती आहे ते अनुभवायला मिळाले. घरी आता मुलांमध्येही पालट होत आहेत.

३. सौ. सुमित्रा गवळी, सांगली – मी एक शिक्षिका असून शाळेत विद्यार्थ्यांसाठी मानसपूजा घेणे, सणांविषयी माहिती देणे, तसेच शिक्षकांनाही विविध सण, उत्सव यांविषयी माहिती देते. आमच्या शाळेत पूर्वी ‘सनातन संस्थे’च्या संदर्भात काही सांगू देत नसत; मात्र विद्यार्थ्यांमधील होत असलेले पालट पाहून आता शाळेत ‘आवर्जून विषय सांगा’, असे सांगतात.

शिबिरात गटचर्चेत सहभागी जिज्ञासू
शिबिरात गटचर्चेत सहभागी जिज्ञासू

 

समारोपीय सत्रातील काही जिज्ञासूंचे मनोगत

१. सौ. आसावरी एरंडे, कोल्हापूर – दिवसभरात अनेक वेळा भावजागृती होत होती. हे शिबिर संपू नये, असे वाटत होते.

२. सौ. वर्षा देसाई, ईश्वरपूर, सांगली – यापुढील काळात हस्तपत्रके वितरण करणे, प्रवचन घेणे, या माध्यमांतून सेवा करण्याचा प्रयत्न करेन.

३. डॉ. अरविंद संकपाळ, इचलकरंजी – विविध जिहादच्या संदर्भात माहिती मिळाली. मला कोरोनाचा संसर्ग झाल्यावर नामजपाचा पुष्कळ लाभ झाला आणि त्यामुळेच मी बरा होऊ शकलो.

४. शर्वरी जोशी, सांगली – मी आज सकाळी ५ वाजल्यापासून अन्य कामे आटोपून शिबिरासाठी आले आहे. इतका वेळ होऊनही सत्संगात कंटाळा आलेला नाही. अद्यापही चैतन्यही जाणवत आहे. साधना सर्वांगिण प्रगतीसाठी उपयुक्त आहे, याची जाणीव झाली.

५. डॉ. स्नेहल शेंडे, कोल्हापूर – आजचा दिवस अविस्मरणीय होता, तसेच आजचा दिवस सकारात्मकता, धार्मिकता आणि उर्जेने भरलेला होता. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात; मात्र त्यावर साधना हेच उत्तर आहे’, हे मनावर बिंबले.

Leave a Comment