देवतांच्या युद्धातील गुढी !

देवासुर संग्रामात देवता विजयी झाल्यावर देवसैनिक सोन्याच्या काठीला रेशमी वस्त्रे लावून त्यावर सोन्याचा गडू ठेवतात. गुढीच्या अस्तित्वामुळे संपूर्ण वातावरणाला आणि वातावरणात वावरणार्‍या जिवांना गुढीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा जास्त प्रमाणात लाभ होतो. त्या अनुषंगाने श्रीविष्णूने देवसैनिकांना युद्धाच्या प्रत्येक स्तरावर लाभ होण्यासाठी युद्धाला जाण्यापूर्वी, युद्धाच्या वेळी आणि युद्धसमाप्तीनंतर विविध प्रकारच्या गुढ्या नेण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे त्या नेल्या जातात.

१. युद्धाच्या प्रत्येक स्तरावर युद्धातील गुढी उभी करण्याचे कारण

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

२. युद्धात गुढीचा वापर केल्याने उच्च देवतांचा तत्त्वरूपी आशीर्वाद प्राप्त होणे

अशा प्रकारे गुढीला लावलेल्या वस्त्राप्रमाणे त्यातून आवश्यकतेनुसार शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरी प्रक्षेपित होऊन सर्वांनाच लाभ होतो. गुढीमुळे उच्च लोकांतून ब्रह्मांडात प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्मतम स्तरावरील लहरी गुढीत आकृष्ट होऊन त्याचा देवसैनिकांना लाभ होतो. गुढीतून मिळणार्‍या चैतन्याच्या बळावर देवसैनिक महा-असुरांशीही निर्भयपणे युद्ध करून विजयी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेव, महादेव आणि श्रीविष्णु यांच्या देवतांना लाभणार्‍या आशीर्वादात्मक तत्त्वलहरींमुळे उच्च देवतांचा युद्धात अप्रत्यक्ष सहभाग असतो.

३. स्वर्गलोकातील गुढी आणि पृथ्वीवरील गुढी यांतील फरक

1365594627_Devata-va-Manavachi-Gudhi_500

देवतांमध्ये भाव असल्यामुळे आणि स्वर्गलोकातील वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय असल्याने गुढीला केवळ वस्त्र लावल्यानेही गुढीत उच्च लोकांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरी आकृष्ट होतात आणि देवतांना त्याचा लाभ होतो. गुढीतील देवत्वाचा सन्मान करण्यासाठी काही वेळा गुढीला पुष्पहार वहातात. पृथ्वीवरील वातावरण रज-तमात्मक असल्याने आणि पृथ्वीवासियांचा ईश्‍वराप्रती भाव कमी असल्याने गुढीला कडुलिंबाची पाने अन् बत्ताशांची माळ घालावी लागते. पृथ्वीवरील गुढीच्या तुलनेत स्वर्गलोकातील गुढीत २० टक्के जास्त प्रमाणात चैतन्य ग्रहण होते आणि त्याचे प्रक्षेपण होण्याचे प्रमाणही १० ते १५ टक्के इतके जास्त असते.

– ईश्‍वर (कु.मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २९.३.२००६ रोजी दुपारी १२ ते १२.३५)

युद्धाच्या विविध स्तरांवर उभ्या केलेल्या गुढीचा भावार्थ आणि त्याचा देवसैनिकांना होणारा लाभ

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment