गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !

गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.

कुठे हिंदूंची कोटी कोटी वर्षांची परंपरा आणि कुठे पाश्चात्त्यांची केवळ अडीच सहस्त्र वर्षांची परंपरा !

काल अनंत आहे. तो कल्प, मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो. सध्या ब्रह्मदेवाच्या जीवनातली ५० वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणजेच १ परार्ध पूर्ण झाला आहे.

देवतांच्या युद्धातील गुढी !

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ

पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.