सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित
येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले.