
रामनाथी (गोवा) – वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत गोव्यातील ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष श्री. राज शर्मा हेही उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमातून चालू असलेले अध्यात्म, राष्ट्र, धर्म प्रसार, तसेच आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याविषयी अवगत केले. सर्व संतांना ‘गोव्यात असा सुंदर आश्रम आहे’, हे बघूनच खूप आनंद झाला.
To truly understand and experience the richness of Sanatan Dharma, do visit the @SanatanSanstha‘s Ashram
Blessings from Param Gobhakt Sant Gopesh Krishnadasji Maharaj of Vrindavan
During the visit to the Ramnathi Ashram (Goa), Maharaj said: “Sanatan Sanstha is doing great work… pic.twitter.com/DazxgRkXMX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2026
या प्रसंगी गोपेश कृष्णदासजी महाराज, ‘किती सूक्ष्म आणि शुद्ध विचार करून आश्रमाची रचना अन् व्यवस्था केली आहे’, असे पुन:पुन्हा म्हणत होते. ते म्हणाले की, तुम्ही सनातन संस्कृतीसाठी पुष्कळ छान कार्य करत आहात. आश्रमातील प्रत्येकाच्या चेहर्यावर एक समाधान आणि सुमधुर हास्य आहे. हा आता आमचाच आश्रम आहे. पुढच्या वेळेस आम्ही हक्काने येथे येऊ.

‘गो सम्मान आवाहन अभियाना’चे आयोजन
या मंगलप्रसंगी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी तिन्ही संतांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी गोपेश कृष्णदासजी महाराज यांनी गोव्यात येण्याचे प्रयोजन सांगितले. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारने गोहत्येच्या विरोधात राष्ट्रव्यापी गोहत्या प्रतिबंधक कायदा करावा’, यासाठी देशभरातील साधू-संतांनी ‘गो सम्मान आवाहन अभियान’ चालू केले आहे. त्याच्या प्रचारकार्यासाठी ते देशभर फिरत आहेत. या कार्यासाठीच ते गोव्यातही आले आहेत.

सनातन धर्माच्या परंपरांचे दर्शन करायचे असेल, तर सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट द्याच ! – गोपेश कृष्णदासजी महाराज यांचे आशीर्वचन
रामनाथी (गोवा) – ‘सनातन धर्म आणि त्याच्या परंपरांचे दर्शन करायचे असेल’, ‘सनातन धर्म काय आहे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर आपण गोमंतकतीर्थ येथे असलेल्या सनातन संस्थेच्या आश्रमाला अवश्य भेट द्या. सनातन धर्मातील तत्त्वांना इतक्या बारकाव्यांनिशी, वैज्ञानिक पद्धतीने आणि अत्यंत सोप्या भाषेत प्रस्तुत करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे. ही संस्था केवळ आणि केवळ सनातन धर्मासाठीच कार्य करत आहे, असे अशीर्वचन वृंदावनचे महान गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराजांनी दिले. त्यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट दिली. या वेळी ते बोलत होते.
वास्तविक भारत पहायचा असेल, तर सनातनच्या आश्रमाला भेट द्या ! – प्रकाश दासजी महाराज
या वेळी त्यांच्यासमवेत आलेले प्रकाश दासजी महाराज म्हणाले की, आज गोमातेची भूमी असलेल्या गोव्यात आमची धारणाच पालटून गेली. आम्हाला वाटायचे की, गोवा हे सहल करण्याचे स्थान आहे; परंतु गोवा ही आध्यात्मिक भूमी आहे, जिथे सनातन संस्थेचा इतका भव्य आश्रम आहे. येथे सनातन धर्माच्या संस्कारांचे दर्शन होते. प्राचीन भारतातील गाय, गीता, गंगा आणि यांची उपासना, संस्कार आणि सकारात्मकता या आश्रमात पहायला मिळते. वास्तविक भारत पहायचा असेल, तर सनातनच्या आश्रमाला भेट द्या !
सनातन संस्थेचे अध्यात्माशी एकनिष्ठ साधक जगाचे भले होण्यासाठी प्रयत्नरत ! – प्रकाश नारायणजी महाराज
हा आश्रम अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. अध्यात्माशी एकनिष्ठ आणि एकरूप होऊन जगणारे या आश्रमातील कित्येक साधक-साधिका जगभरातील लोकांचे भले करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अध्यात्मातील ‘का’ आणि ‘कसे’ याचे वैज्ञानिक उत्तर येथे मिळते. आम्ही ज्याप्रमाणे गोमातेशी सर्वांनी जुळावे, असे म्हणतो, तसे सनातन संस्थेशीही जुळावे, असे आवाहन करू, असे आशीर्वाद आश्रमाला भेट दिल्यानंतर प्रकाश नारायणजी महाराज यांनी दिले.
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला...
नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट