
पुणे, ३० मार्च (वार्ता.) – ‘जय शंकर प्रतिष्ठान’ आणि ‘ब्राह्मण सेवा संघा’चे संस्थापक अध्यक्ष विप्र शिरोमणी श्री. सु.द. उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या वतीने चैत्र दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात २६ मार्च या दिवशी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. या वेळी श्री. पप्पाजी पुराणिक यांनी धर्मप्रेमींच्या वतीने सद्गुरु स्वाती खाडये यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान केला.
हनुमानचालिसा पठण स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा !
‘स्वामी गुरुकुल फाउंडेशन’ आणि डॉ. ज्योतिषाचार्य सौ. वैशाली शरद देशमुख यांच्या वतीने रामनवमीनिमित्त हनुमानचालिसा पठण स्पर्धा, श्रीरामकथा आणि शोभायात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते. २६ मार्च या दिवशी रामकथेच्या सांगतेनंतर हनुमानचालिसा पठण स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी श्री. पप्पाजी पुराणिक, भागवताचार्य श्री. नरेंद्र जोशी, विद्यमान नगरसेविका माई भाडळे, श्री. अभिजित बोराटे, डॉ. सारिका भाडळे, श्री. राजीव भाडळे, मीनाताई बनकर आणि बाळासाहेब ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमातही सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.
हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचे आवाहन !
सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की, हिंदु राष्ट्राची निर्मिती ही काळाची आवश्यकता असून प्रत्येक हिंदूने संघटित होणे आवश्यक आहे. श्री. पप्पाजी पुराणिक यांनी या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्याला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला