खोपोली (जिल्हा रायगड) – वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि पाश्चात्त्य प्रथांचे अंधानुकरण नसून तो समाजहित आणि धर्मप्रसार यांचा भाग असू शकतो, याचा आदर्श खोपोलीतील उद्योजक श्री. यशवंतशेठ लक्ष्मण साबळे यांनी घालून दिला आहे. श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि हनुमानचालिसा’ या लघुग्रंथांच्या ५०० प्रतींचे वितरण केले.
प्रारंभी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष श्री. विक्रम साबळे, उपस्थित नगरसेवक, नगरसेविका आणि इतर मान्यवर यांना हा लघुग्रंथ भेट देण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी वरीलप्रमाणे लघुग्रंथ दिले. उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
श्री. यशवंतशेठ साबळे म्हणाले, ‘‘या लघुग्रंथांचे वितरण करून मला समाधान आणि आध्यात्मिक आनंदही मिळाला. ग्रंथांमुळे कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे पालटले असून उपस्थितांमध्ये वेगळाच उत्साह आणि सात्त्विक वातावरण निर्माण झाले.’’
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !