सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांना “धर्म अलंकार पुरस्कार” आणि “माँ पटन देवी सन्मान” ने सन्मानित

  • धर्म आणि अध्यात्म क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी करण्यात आला सन्मान !
  • सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी स्वीकारला सन्मान !
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना सन्मानचिन्ह प्रदान करतांना विश्व ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉ. एच्.एस्. रावत, विश्व ज्योतिष महासंघाचे सभापती आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा

पाटलीपुत्र (बिहार), ७ एप्रिल (वार्ता.) – येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांना धर्म आणि आध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘‘धर्म अलंकार पुरस्कार’’ आणि “माँ पटन देवी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्ह, माँ पटन देवी सन्मान पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानाचा स्वीकार सद्गुरु निलेश सिंगबाळ यांनी केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सन्मानचिन्ह
प्रमाणपत्र
पदक

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्ष १९९८ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारत विश्वगुरु बनण्याची केलेली भविष्यवाणी !

संशोधन सादर करतांना डावीकडे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि व्यासपिठावर उपस्थित संत अन् मान्यवर

या संमेलनात सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘भारतभूमीची आध्यात्मिक शुद्धता, तिच्या आध्यात्मिक आणि सांसारिक प्रगतीचे प्रमाण कसे आहे ?’, या विषयावर संशोधन सादर केले. त्यांनी सांगितले की, वर्ष १९९८ मध्येच संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भविष्यवाणी केली होती की, ‘भारत अशा राष्ट्राच्या रूपात उदयास येईल, जिथे सनातन धर्म केंद्रस्थानी असेल आणि तो विश्वगुरुचे स्थान प्राप्त करेल.’

Leave a Comment